मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली असून, विविध पातळ्यांवर तयारी सुरू करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आपले अर्ज ६ जुलैपर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवू शकतात.
यंदाच्या लोकसभेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभेत झालेल्या चुका टाळण्याचा निर्धार करत विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, येत्या विधानसभेत आघाडीची रणनीती कमी येणार का ? अपेक्षित यश मिळवू शकणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.