HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी!

मुंबई | संपूर्ण देशात कोरोनाचे संकट थैमान घालत आहे. यासाठीच कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची वारंवार मागणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्तीच आहे, असं म्हटलं आहे. आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत आज (२९ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बातचीत करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी अशी मागणी गेल्या महिन्याभरापासून करत आहेत. त्यांनी पंतप्रधानांना वारंवार आवाहनही केलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. कोरोनाच्या संकटामुळे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट अॅक्टिव्ह झालं आहे.

कोरोना कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. मला वाटत त्यांच्या घरापर्यंत कोरोना गेला आहे. कोर्ट झालंय, त्यामुळे देशाला नक्कीच काही ना काही फायदा होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे. जगही ते पाहत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र मॉडेलच कोरोना संकटाला तारेल, राऊतांचा विश्वास

कोरोनाचं संकट वाढत आहे. देशातील जनता दहशतीत आहे. काय होत आहे हे लोकांना माहीत नाही. लोकांना मार्गदर्शन केलं जात नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता देशाला महाराष्ट्र मॉडेलनेच काम करावं लागणार आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं खूप काम करण्यात आलं. पण कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वात चांगलं काम केलं आहे. त्याची दखल आज ना उद्या कोर्ट घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही !

swarit

नाशिक निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपने स्थायी सदस्य पाठवले सहलीला!

News Desk

पार्थ पवार आजोबांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

News Desk