HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग! सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन उड्डाणपुल कोसळला

मुंबई | नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग लोकार्पणा आधीच एक दुर्घटना झाली आहे. या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गावरील ५०० मीटर लांब असलेल्या निर्माणाधीन पुलाचा मोठा भाग काल (२७ एप्रिल) कोसळला. हा पूल सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ भागाला जोणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपूल होता. या दुर्घटनेवेळी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी महामार्गावर काम करत असलेले मजूर हे शातात जेवण करत होते. यावेळी ट्रेलर ट्रक या गर्डरखाली येऊन मोठे नुकसान झाले. 

दरम्यान, महामार्ग निर्माणाधीन पूल हा ५०० मीटर लांबीचा असून ८० फूट उंच आहे. या आधी महामार्गावर पूल कोसळण्याची दुसरी घटना असून महामार्गावरील लोकार्पणाच्या लगभगीमुळे या दुर्घटना होत आहे असल्याच्या चर्चा होत आहेत.  यापूर्वी २४ एप्रिलला नागपूरमधील ३६ किलोमीटर समृद्ध महामार्गावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात कमानीवर काँक्रिटसह पुलाचा अर्था भाग खाली कोसळला. या महामार्गावर एकूण १०५ कमानी आहेत. यात १६ व्या कमान कोसळून हा अपघात झाला होता. यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. 

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते वाशिमच्या सेलू बाजारापर्यंतचा पहिल्या टप्प्याचे २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. आता  महामार्गावर दोन दुर्घटना झाल्यामुळे लोकार्पण पुढे ढकलण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी…

News Desk

राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करणार

News Desk

राम मंदिराचा वाद पेटला, भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा, प्रत्युत्तरासाठी शिवसैनिकही एकवटले

News Desk