मुंबई | “ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावर जीएसटी लावला जात असून हा जीएसटी हटवण्यात यावा”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे.
While India is reeling at the lack and unavailability of medical apparatus, a 12% levy on them is simply absurd. @FinMinIndia should heed words of @ASSOCHAM4India and waive of GST levies on all O2 equipments immediately. It is choking our health care system. pic.twitter.com/M2tupGUqkI
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 8, 2021
द असोसिऐटेड चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेने अर्थमंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. त्याच पत्राचा आधार घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटात भारतात औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे अशावेळी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे.
हा जीएसटी हटवल्यास आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण थोड्याप्रमाणात कमी होईल असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.