HW News Marathi
देश / विदेश

मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे ४७ वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी न्यायमुर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज (१८ नोव्हेंबर) शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद बोबडे यांना सकाळी ९.३० वाजता आपल्या पदाची शपथ देण्यात आली आहे. बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकाराला आहे.

न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान मिळविणारे बोबडे हे तिसरे न्यायाधीश आहेत. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी १८ ऑक्टोबरला न्यायमुर्ती बोबडे यांची आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. न्यायमुर्ती बोबडे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. बोब़डे यांनी अयोध्या निकाल प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बोबडे यांचा अल्प परिचय

शरद अरविंद बोबडे हे मुळेचे नागपूरचे आहेत तर त्यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपूरमध्ये झाला. बोबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून सराव सुरू केला. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे १९७८ मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. मार्च २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ही बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, बोबडे यांनी मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर येथे कुलपती म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे २३ एप्रिल २०२१ रोजी निवृत्त होतील. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून ५२३ दिवसांचा दीर्घकाळ असणार आहेत. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे ४६ सरन्यायाधीशांपैकी फक्त १६ जणांना ५०० दिवसांचा कार्यकाळ मिळाला आहे, आता त्यात न्यायमूर्ती बोबडे यांची नाव सामील होणार आहे. यापूर्वी सरन्यायाधीश कापडिया १२ मे २०१० ते २८ सप्टेंबर १२ यांना ८७० दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगढमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

News Desk

राष्ट्रपती रामनाथ कोविंदही करणार कोरोनाची चाचणी

swarit

“पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास रक्तरंजित,” बंगाल हिंसाचारावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk