HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत वंचित बहुनज आघाडी युती करण्यास इच्छुक! – प्रकाश आंबेडकर

मुंबई | “महापालिका निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करणार आहे,” अशी इच्छा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखती व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी एच. डब्ल्यू. मराठीला खास मुलाखत दिली आहे. आगामी काळात महापालिका निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने तयारी करत  आहे, या प्रश्नावर उत्तर देताना आंबेडकर म्हणाले, “तुम्हाला असे वाटते की, महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका होणार असत्या तर त्या आतापर्यंत झाल्या असत्या. मग कायद्या दुरुस्ती का केली, असा उलट सवाल त्यांनी सरकारला केला आहे. ते पुढे म्हणाले, मला वाटत नाही की महापालिकेच्या निवडणुका होतील.” मग पालिका निवडणुका कधी होतील, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हटले, महानगरपालिका निवडणुका होणारच नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगतिले आहे. 

पालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून युतीसोबत वंचित बहुजन आघाडी युतीसंदर्भाच मागणी केली यावर आंबेडकर म्हणाले, “नाना पटोलेंनी जे वक्तव्य केले ते युतीच्या विरोधात आहेत. म्हणजे सरळ सरळ काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत युती नकोय. हे नाना पटोलेंनी मांडले आहे.” महाविकासआघाडी हे तीन पक्षाचे सरकार आहे मग वंचित आघाडी फक्त काँग्रेससोबत जाणार आहे की, राष्ट्रवादी की शिवसेनासोबत पण जाण्याचा विचार करत आहात, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीशीच्या प्रतिनिधी विचारलावर ते म्हणाले, “आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायला हरकत नाही, असा पक्षाचा निर्णय झाल्याचे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे. 

आक्रमकता आणून दंगल होऊन अशी परिस्थिती निर्माण केली जाते – प्रकाश आंबेडकर 

सध्या राज्यात दोन समजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, या प्रश्नावर प्रकार आंबेडकर म्हणाले, “मी दोन समाजात म्हणणार नाही, दोन धार्मिक लोकांमध्ये तेढ निर्माण करण्यात येत आहे. यात एका बाजुला मुस्लिम समाज आणि दुसऱ्या बाजुला सर्व हिंदू नाही तर हिंदूमधला एक वर्ग असा आहे, असे आपल्याला दिसत आहे. आणि आक्रमकता आणून दंगल होऊन अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. शासनाने पहिल्या खुलासा करावा, भोंग्याला लावण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण, कायद्याच्या चौकटीत राहून ती परवानगी देण्यात आली आहे. हनुमान चालिसाचे पठण करायचे असेल तर तुम्हाला कोणी थांबवले नाही. पोलिसांकडे जावून अर्ज करा. परवानगी घ्या. पोलिसांनी परवानगी दिली की तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करा.”

Related posts

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

News Desk

शरद पवारांना UPAचं अध्यक्ष करा आणि काँग्रेसचं पुनर्गठन करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला

News Desk

पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, शासन सदैव आपल्या पाठीशी

News Desk