HW News Marathi
Covid-19

आपलं नाणं खणखणीत हाय, कारण आपल्या मागं आपला चुलता  उभाय ! 

मुंबई । राज्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मात्र, या मतदारसंघात कायमच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. यंदा या पोटनिवडणुकीसाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमकपणे आणि उत्साहाने सहभाग घेत आहेत. आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहेत. या प्रचारसभेत अजित पवारांचे एक भाषण चांगलेच गाजत आहे.

अजित पवारांची भाषणाची अशी स्वतःची खास शैली आहे. त्यांची हीच खास शैली यंदा पंढरपूरच्या प्रचारातही चांगलीच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर, पंढरपुरातील अजित पवारांचे एक भाषण गाजत आहे. अजित पवार आपल्या या भाषणात म्हणत आहेत की “आपलं नाणं खणखणीत हाय, कारण आपल्या मागं चुलता उभा हाय. शरद पवार साहेब. आणि ते कायम माझ्या पाठीशी उभे राहणार ह्याची मला खात्री हाय.” अस्सल गावरान भाषेत शरद पवारांचा उल्लेख करत अजित पवारांनी केलेले हे भाषण प्रचंड गाजत आहे.
अजित पवारांनी याचवेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर बोचरी टीका करण्याची संधीही सोडलेली नाही. “ज्यांचं बारामतीमध्ये दोनदा डिपॉझिट जप्त झालं ते इथे येऊन तुमच्या पुढे भाषण करत आहेत. हर्षवर्धन पाटलांचा पराभव तर आमच्या दत्ता मामा भरणेंनी केला आणि आता ते तुमच्याकडे येऊन मतं मागतायत”, असा जोरदार टोला अजित पवारांनी आपल्या या भाषणात लगावला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी आता थेट १ सप्टेंबरला होणार

News Desk

पिंपरी-चिंचवड मधील एका लघुउद्योजकास महावितरण विभागाकडून तब्बल ७९ कोटींचे बिल थोपवले

News Desk

देशात पुन्हा लॉकडाउन लागणार?,केंद्र सरकार म्हणतं…

News Desk