पुणे। व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीनंतर अखेर राज्य सरकारनं पुण्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय आज पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलाय. ही शिथिलता देत असताना मात्र अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना इशाराही दिला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास शिथिलता मागे घेत पुण्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जातील असा इशारा अजितदादांनी दिला आहे.
पुण्यात शिथिलता
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्हिटी रेट साडे तीन टक्क्याच्या आसपास आला आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिकांची मागणी लक्षात घेता शिथिलता देण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दर्शवली. त्यानंतर आज शिथिलता देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास पुन्हा कठोर निर्बंध लागू केले जातील असा इशारा अजितदादांनी दिलाय. तसंच सरकारनं घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुकानदार, त्यांचे कर्मचारी त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.
In Pune and Pimpri Chinchwad, all the shops to remain open till 8pm for six days a week. All hotels, restaurants allowed to operate with 50% seating capacity till 10pm on all days. All relaxations to be effective from 9th August: Maharashtra Minister Ajit Pawar
(file photo) pic.twitter.com/7nxIIIRL51
— ANI (@ANI) August 8, 2021
13 तालुक्यात लेवल 3 चे निर्बंध लागू
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या 13 तालुक्यांसाठी लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत. सोमवारपासून हे नियम लागू असतील. काही लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातही शिथिलता देण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे 13 तालुक्यात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.