HW News Marathi
महाराष्ट्र

“भरणेमामा मंत्री झाले कधी जॅकेट घातलं का? मी कधी घालतो का?” अजित पवारांचा ‘हा’ टोला कोणाला ?   

इंदापूर | “भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?”, असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (६ फेब्रुवारी) माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पार पडले आहे. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. आपल्या खास शैलीत अजित पवार यांचे हे भाषण पाहायला मिळाले आहे. इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील यावेळी उपस्थित होते, यावेळी अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली आहे.

मामा मंत्री म्हणून नवखा, पण पाठपुरावा करायला चिकट !

अजित पवार यावेळी म्हणाले कि, “तुमच्या दत्तात्रय भरणेंना मंत्री केलं आहे. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आहे. रस्त्याची सगळी कामे पठ्ठ्याकडेच आहेत. अशोक चव्हाणही त्यांना मदत करतात. सामान्य प्रशासन विभाग जे खातं मुख्यमंत्री ठेवतात त्याचं राज्यमंत्रीपद दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिलं आहे. मामा मंत्री म्हणून नवखा पण पाठपुरावा करायला चिकट आहे.”

“तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बँक चालवता येत नाही. काय चाललंय काय?”

अजित पवार यांनी यावेळी आणखी एक मुद्दा उचलत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “आपल्या इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बँक चालवता येत नाही. काय चाललंय काय?”, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. अजित पवारांच्या खास शैलीतले हे भाषण आणि टोलेबाजी चांगलेच गाजत आहे. यावेळी कोरोनास्थितीविषयी बोलताना अजित पवार यांनी मिश्किल टोलेबाजीही केली, “कोरोना कमी होत असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाला. काळजी घ्या इथं कुणीच मास्क लावलेला दिसेना. कोरोना कुणालाच सोडत नाही. ना दादाला ना मामाला. दादालाही कोरोनानं सोडलं नाही”, असे अजित पवार म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र विधानसभेकरिता योगी आदित्यनाथ यांची मुंबईत सभा

News Desk

“गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे”, संभाजीराजेंची भूमिका

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

Aprna