HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही सेनेला वाटाण्याच्या अक्षता, गितेंच्या वक्तव्यावर दरेकरांची प्रतिक्रिया!

मुंबई। सरकार आघाडी सांभाळेल, तुमची आपली जबाबदारी काय आहे तर आपल्याला गाव सांभाळायचा आहे. हे गाव सांभाळत असताना आघाडीचा विचार नाही तर फक्त शिवसेनेचा विचार करायचा असल्याचे विधान शिवसेना नेते अनंत गिते यांनी केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री शिवसेनामधील आहे परंतु शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता येतायत असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. गितेंचे वक्तव्य संजय राऊत यांनी खोडलं आहे. यामुळे गितेंनी मांडलेली भूमिका योग्य आहे की, संजय राऊत यांची पक्षाची भूमिका योग्य आहे? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी

महाविकास आघाडी आघाडीचं बघून घेल, शरद पवार यांना आपण नेता माणत नाही आपले फक्त बाळासाहेब ठाकरे गुरु आहेत. असे वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे. गितेंच्या वक्तव्यासंदर्भात दरेकर यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने शिवसेनेवर दबाव टाकून पक्षाचा विस्तार करत आहेत. या सर्वाची वेदना, भावना अनंत गितेंच्या वक्तव्यातून आली असल्याचे मला वाटत आहे. अनैसर्गिक युती ही एक तडजोड होती असा उल्लेख गितेंनी केला असून तो खरा आहे. म्हणून शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे. शिवसेनेचे आमदार ज्या ज्या विभागात काम करत आहेत त्यांना अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी देण्याबाबतीत स्वःदुजाभाव असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीवर घणाघात

गितेंच्या वक्तव्यानंतर रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी बैठक घेतली. हा सर्व प्रकार पाहून सरकारमध्ये काय चाललंय हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. जर सरकारमध्ये सुसंवाद आणि समन्वयाचे वातावरण आहे. असे सांगितले जाते आणि त्यानंतर गितेंचे वक्तव्य आल्यानंतर थोडावेळही थांबण्याची तयारी राष्ट्रवादीच्या खासदारांमध्ये नाही. याचा अर्थ शिवसेनेसोबत नांदायचे आहे की, शिवसेनेच्या आरेला कारे करण्याची भूमिका राष्ट्रवादीने स्वीकारली असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?, सत्य समोर यायला हवे! । आशिष शेलार

News Desk

जिल्हा परिषद आणि महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेचा शुभारंभ

News Desk

मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे घ्या, पत्राद्वारे संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk