HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर, तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर!

बीड। करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना आहेत. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

५ सप्टेंबरला त्यांना अटक करण्यात आली होती

जातीवाचक शिवागाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शर्मा आणि त्यांचा गाडी चालक अरुण दत्तात्रय मोरे यांना परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी ५ सप्टेंबरला त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हापासून त्या न्यायालयीन कोठडी होत्या. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ माजली होती.

जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी परळीत जाऊन धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असे जाहीर केले होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी करुणा शर्मा यांनी परळीत येत जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप करत त्यांच्य़ाविरोधात अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. अशा दोन्ही गुन्ह्यांची शिक्षेसाठी करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…असंच राहीलं तर आम्ही दरवर्षी तुम्हाला भेटत राहणार,” मु्ख्यमंत्र्याचं कोल्हापुरातील गावकऱ्यांना आवाहन

News Desk

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येत वापरलेले पिस्तुल सापडले, सीबीआयला मोठे यश

swarit

सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या !

News Desk