HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

मुंबई | भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेता ठरविण्यासाठी आज (३० ऑक्टोबर) बैठकीला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने विधीमंडळात प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर औपचारिकपणे या बैठीकीत शिक्कामोर्तब झाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून यावेळी नेता निवडीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता .

निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुढील पाच वर्षाच अजून चांगले काम करेन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांने राज्य करू, असे वचन फडणवीस यांनी विधीमंडळ नेते पदी नियुक्ती झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांना संबोधित करताना म्हणाले. तसेच महायुतीचे सरकार स्थापन होण्याच विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. सुधीर मुनंगटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्र राजे भोसले, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा गणेश नाईक यांनी अनुमोदन दिले. तसेच भाजपकडून शिवसेनेला १३:२६ फॉर्म्युल्याचा प्रस्थाव ठेवण्यात आला आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेचे १३ आणि भाजपचे २६ मंत्री असा प्रस्ताव देण्यात आला आहे. यात भाजपकडे मुख्यमंत्रीपद, गृह, नगरविकास, अर्थ, महसूल ही महत्तावची मंत्री पदे सोडून इतर खात्यांवर शिवसेनेसोबत चर्चा करण्याचा भाजप तयार असल्याचे या बैठकीतून मिळाली आहे. तसेच भाजपकडून शिवसेनेसाठई उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तेलतुंबडेंना अटक

News Desk

जिल्हयात बोकाळलेला ‘माफिया राज’ बंद करा बीड

News Desk

‘… ‘गरबा’ कराल तर आम्हालाही ‘झिंगाट’ दाखवावा लागेल’, मनसेचा अदानीला इशारा

News Desk