HW News Marathi
Covid-19

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त!

मुंबई | महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. आज (४ नोव्हेंबर) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबरला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ते या आधी जेम्हणाले होते त्याप्रमाणे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते आणि आज त्यांना डिस्चार्ज दिला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी काही दिवस त्यांना घरीच विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजनही होते. त्यामुळे लवकरच ते पुन्हा कामातून सक्रिय होतीलच. तसेच, काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोना झाला होता आणि त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे का ? संजय राऊत म्हणतात

News Desk

आमच्या अन् मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘सामाना’ने पुन्हा नवा अग्रलेख लिहावा ! 

News Desk

ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत रद्द केली भारतातून येणारी प्रवासी विमाने

News Desk