HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा ‘हा’ क्रमांक एकचा पक्ष होता-राहील! – देवेंद्र फडणवीस

मुंबई। राज्यात नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेमध्ये निकाल लागले आहे. या निकालामध्ये भाजपने नगरपंचायतमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून आले. सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील, असे ट्वीट विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस करत त्यांनी महाविकासआघाडीवर टीका केली आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाची म्हणजे महाविकासआघाडीची सरकार आहे. यामुळे आता  भविष्यात पुन्हा एकदा भाजपची सत्तेत येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आणि राज्यात शिवसेनेचा दबदबा कमी झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

२०१७ मध्ये भाजपकडे  नगरपंचायतमध्ये ३४४ सदस्य होते. आता या आकड्यात वाढून ४१७ सदस्यांवर येवून पोहोचली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडे २०१७ मध्ये २०१ सदस्य होते. भाजप प्रमाणे शिवसेनेच्या सदस्य वाढवून २९० वर पोहोचली आहे. तसेच राष्ट्रवादीकडे ३३० सदस्य होते. या संख्खेत वाढ होऊन आता३६९  झाली आहे.  आणि काँग्रेसमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या आकडेवारीनुसार, भाजप प्रथम स्थान, राष्ट्रवादी काँग्रेस दुसरा आणि शिवसेना तिसऱ्या स्थानावर दिसत आहे. 

राज्यात काल (१९ जानेवारी) नगरपंचायत आणि नगरपालिकेत निकाल हाती आले. यानुसार, राज्यातील ३४ नगरपालिका आणि नगरपंचायत अशा मिळून ४०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवित महाविकासआघाडीला वर्चस्व दाखविले आहे. तसेच गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणि भंडारा जिल्हा परिषदेत भाजपने हातमिळवणी करत सत्तेवर येणार आहे. 

भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील – फडणवीस

“मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपाच्या २४ आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक ४१५ हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे,” नगरपंचयतीच्या निकालानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुलाब चक्रीवादळाचे ठाण्यात आगमन!

News Desk

मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल – देवेंद्र फडणवीस

News Desk

पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागा नदीत ड्रेनेजचं पाणी

News Desk