HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?; पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

मुंबई | पोलीस बदली प्रकरणी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी फडणवीसांची तब्बल दोन दास चौकशी केली आहे. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषदेत घेऊन महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. बदली घोटाळा राज्य सरकारने सहा महिने दाबून ठेवला. मला जे प्रश्न पाठवले आणि जे प्रश्न विचारले यात फरक होता. तसेच गोपनीय कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे मला प्रश्न विचारले, असा आरोपही फडणवीसांनी राज्य सरकारवर केली आहे. 

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आज (१३ मार्च) फडणवीसांच्या सागर निवासस्थानी दुपारी १२ वाजता चौकशी करण्यास सुरुवात केली. फडणवीसांना बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. परंतु, पोलीस फडणवीसांच्या निवासस्थानी येवून त्यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून पुण्याच्या महापालिकेच्या बाहेर महाविकासआघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर मुंबईत सुद्धा फडणवीसांच्या निवसस्थाना बाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. फडणवीसांनी काल पत्रकार परिषद घेत म्हटले की, मी स्व:ता एक वकील आहे. आणि राज्याचा गृहमंत्री सुद्धा राहिलो आहे. त्यामुळे मी मुंबई पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणार आहे, असे ट्वीट करून माहिती दिली

फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • संजय राऊत घाबरून दररोज पत्रकार परिषद घेतात
  • संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे जावे, म्हणून हायकोर्टात जावू
  • आम्ही पुन्हा येऊ,असे पोलीस सांगितले नाही
  • घोटाळे बाहेर काढून म्हणून सरकारचा दबाव
  • मी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर दिली
  • मला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही
  • मला आरोपी बनवण्यात येईल,असे प्रश्न विचारले
  • मी पेनड्राईव्ह कोणालाही देणार नाही
  • गोपनीय कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे मला प्रश्न विचारले
  • मला जे प्रश्व विचाले मी त्यांची उत्तरे दिली
  • मला जे प्रश्न पाठवले आणि जे प्रश्न विचारले यात फरक
  • बदली घोटाळा राज्य सरकारने सहा महिने दाबून ठेवला
  • महविकासआघाडी सरकारने बदली घोटाळ्याचा अहवाल दाबून ठेवला
  • बदली घोटाळ्याची माहिती केंद्रीय सरकारला दिली
  • राज्यात पोलीस बदल्यांचा महा घोटाळा झाला
  • देवेंद्र फडणविसांची पत्रकार परिषद सुरू
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?

News Desk

पुन्हा एकदा अजित पवार-देवेंद्र फडणवीस नव्या वर्षात एकाच मंचावर येणार!

News Desk

भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रानअली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

News Desk