HW News Marathi
Covid-19

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने हेल्थवर्कर म्हणून घेतली होती लस !

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याने काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय वाद उफाळून आला होता. याबाबत बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती. यावेळी माहिती अधिकारात तन्मय फडणवीस यांनी हेल्थवर्कर म्हणून लस घेतल्याची माहिती उघड करण्यात आली आहे. या माहितीमुळे देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

माहिती अधिकारात देण्यात आलेल्या माहितीनुसार, तन्मय फडणवीस याने हेल्थ वर्कर म्हणून ओळखपत्र दाखवून लस घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, तन्मय फडणवीस खरंच हेल्थ वर्कर आहेत का ? की बनावट ओळखपत्र दाखवून तन्मय फडणवीस यांनी ही लस घेतली ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

नेमके काय आहे प्रकरण ?

देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांनी १३ मार्च रोजी सेव्हन हिल्स रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. यावेळी त्यांचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि देवेंद्र फडणवीसांना काँग्रेसकडून कोंडीत पकडण्यात आले होते. त्यावेळी ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? असा सवाल काँग्रेसने ट्विटच्या माध्यमातून केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परिस्थीती नियंत्रणात आली नाही तर पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल – जयंत पाटील

News Desk

१ एप्रिलपासून ४५ पेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार !

News Desk

पिंपरी-चिंचवड मधील एका लघुउद्योजकास महावितरण विभागाकडून तब्बल ७९ कोटींचे बिल थोपवले

News Desk