नागपूर | राज्यात आज कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन होत आहे,शेतकरी थेट राजभवनावर धडकणार आहेत.यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले कुठलही आंदोलन महाराष्ट्रात झाले नाही,काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत, शेतकऱ्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत,असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
फडणवीस म्हणतात ,शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत,आणि आता जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा सवाल आहे काँग्रेस पक्षाने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की बाजारसमित्या रद्द करा आणि आम्ही सत्तेत आलो तर बाजारसमित्या रद्द करू त्यांनी आता उत्तर दिलं पाहिजे!