HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार नव्हे तर शरद पवारच पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई | २०१९ हे वर्ष अनेक मुद्यांमुळे गाजलं. पण महत्वाचं कारण होतं ते म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या शपथविधिच्या मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘नोव्हेंबर २०१९ मध्ये जे काही घडले ते मी का केले असे अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. मात्र त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविले असल्याचे आम्हाला कळाले. त्यानंतर १० ते १२ दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला व राष्ट्रवादीशी बोलणी केली’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामध्ये सगळी बोलणी शरद पवार यांच्याशी सुरू होती असा दावाही फडणवींसांनी केला आहे.नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम आणि त्यात झालेल्या गोष्टी या ॲाफ द रेकॅार्ड होत्या. या कार्यक्रमात सगळ्यांना फोन बंद ठेवण्यास सांगितले होते,तसेच, त्या ठिकाणी कॅमेरेही नव्हते पण तरीही फडणवीसंच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह गेलं आणि ते नंतर डिलीट झालं.याशिवाय ‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’देखील हटवण्यात आली. पण तोवर हा व्हिडिओ मात्र वायरल झाला. अशाप्रकारे ‘लिंक’ हटविण्याचे गुपित काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडूनच आला होता. आमची बोलणीदेखील अंतिम झाली होती. त्यावेळी भाजपची चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे, तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच झाली होती, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच सरकार बनविण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केले. ही सगळी चर्चा देखील शरद पवारांसोबतच झाली होती. राज्यात राष्ट्रपती शासन लागले व त्यासाठी दिलेले पत्रदेखील मीच ‘ड्राफ्ट’ केले होते, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस दलाच्या अत्याधुनिक कार्यपद्धतीमुळे जनमानसात पोलीसांप्रति विश्वासार्हता! – जयंत पाटील

Aprna

मुंबईसह राज्यातील बहुतांश भागांत मान्सूनची हजेरी

News Desk

“फडणवीसांचा ‘हा’ आरोप हास्यास्पद आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, आव्हाडांचे प्रत्युत्तर

News Desk