HW News Marathi
महाराष्ट्र

“सीताराम कुंटे साधे अधिकारी, आव्हाड-मलिक यांनीच अहवाल तयार करुन सही करायला लावली असेल”

मुंबई | फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केला. मी सीताराम कुंटे यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आज (२६ मार्च) मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला आणि भाजपवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक त्रुटी आहेत. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न असेल तेव्हाच फोन टॅप करता येतात, असे अहवालात म्हटले आहे. पण कायद्यानुसार एखादा गुन्हा होण्याचा संशय असेल तर फोन टॅपिंगची परवानगी असते. नेमकी हीच ओळ अहवालातून वगळण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडूनही याच कलमाखाली फोन टॅप केले जातात. त्यामुळे फोन टॅपिंगसंदर्भातील राज्य सरकारचा संपूर्ण अहवालच सदोष आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अहवाल मी नव्हे तर नवाब मलिक यांनी फोडला – फडणवीस

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले नवाब मलिक?

रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणूनच त्यांना वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन बदलण्यात आले. महाविकास आघाडी सरकार बनत असताना सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांचे फोनसुद्धा टॅप करण्याचे उद्योग रश्मी शुक्ला यांनी केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत, असा आरोप करतानाच फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचे मलिक म्हणाले. राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची हालचाल, पोलीस रेकॉर्ड फडणवीस यांनी सादर केले. ते सादर करत असताना ही हालचाल होती की नाही हे मला माहिती नाही, असे सांगून फडणवीस जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय ! – जितेंद्र आव्हाड

फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “फोन टॅपिंग करणं हा मोठा गुन्हा आहे. तसेच कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते. रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची परवानगी गेतली होती का? सिताराम कुंटे यांनी या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे दिले आहे. रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केलेत. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होते. त्यांचे याबाबतच एक पत्रही उघडकीला आले. त्यानंतर त्यांनी आपली चूकही कबूल केली होती”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत’ तर आता राऊतही गरजले!

News Desk

‘त्या’ टोलनाक्याच्या प्रकरणावरुन उदयनराजे भोसले झाले आक्रमक!

News Desk

वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती

Aprna