HW News Marathi
महाराष्ट्र

“…अनेकदा अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली”, फडणवीसांचा चिमटा

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी पहाटे घेतलेला शपथविधी आजही राजकीय इतिहासात कायम आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस होऊन गेला. राजकारणातल्या या विरोधकांचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस नुकताच होऊन गेला. यावरुनच फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला की, जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? त्यावेळी त्यांनी मिश्किलपणे अजित पवारांना चिमटा काढला आहे.

…पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारलंत तर त्यांना जास्त आनंद होईल. कारण त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये पण आता त्याबद्दल काय सांगायचं? अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का असं विचारलं असता राज्यासमोर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न सध्या आहेत, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं होतं.

अजित पवारांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. त्या दिवशी दोघांनीही एकमेकांविषयी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता. या लेखाच्या संदर्भानेच फडणवीस यांना विचारण्यात आलं की, मग तुमचं आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे?, या प्रश्नावर फडणवीस असं म्हणाले की, प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला होता. आता एवढी वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे.

वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचं दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून मी लेख लिहिला. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटतं त्याबद्दल लेख लिहिला आहे. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान राजगृहावर काल झालेल्या तोडफोडीचे राजकीय नेत्यांनी नोंदवला निषेध

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Aprna

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मान खाली घालून जगू शकत नाही | सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

News Desk