पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा आजही राज्याच्या राजकारणात आठवणीची सभा आहे. शरद पवारांनी घेतलेल्या त्या सभेमुळे साताऱ्यात चित्रं बदललं होतं आणि उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान पुन्हा एकदा पावसातील सभा चर्चेत आली आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आली आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस काल (१२ एप्रिल) पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी एकूण ६ सभा घेतल्या. सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर शरद पवारांच्या पावसातील सभेचा उल्लेख करत आपल्याला आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही असं म्हणत टोला लगावला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“मला खासदार निंबाळकर यांनी आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे असं सांगितलं. आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो ही निवडणूक एका मतदारसंघाची निवडणूक असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“सर्व घटकांवर अन्याय करणारं हे सरकार आहे. या सरकारचे १०० अपराध भरले आहेत. १०० अपराधानंतर पहिली संधी पंढरपूरच्या जनतेला, नागरिकांना मिळाली आहे. या निवडणुकीत यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा. त्याची चिंता तुम्ही करु नका,” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
फडणवीस म्हणाले ,लोक म्हणतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का? पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
कोरोना काळातील अपयशाचं खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. तसेच, ‘कमळाचं बटन दाबून समाधान आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,’ असं सूचक विधान करून पुन्हा एकदा सत्तापालटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जयंत पाटलांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तृळात जोरदार रंगली आहे.
Addressed three more rallies at Kasegaon, Gadegaon & Pandharpur in Pandharpur Assembly Constituency for our candidate @autadesamadhan1 dada.
My sincere thanks to people attending in large numbers, that too adhering to the #COVID19 norms.#BJP4Pandharpur pic.twitter.com/4aZMUBuzfd— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.