HW News Marathi
महाराष्ट्र

भाषणात व्यत्यय आणणाऱ्यांवर अजित पवार संतापले, म्हणाले….

पुणे | आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवनेरी किल्ल्यावरही शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. तर यावेळी अजित पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्यावरुन पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवारांसह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी आमदार व खासदार उपस्थित होते. यावेळी अजित पवारांच्या भाषणाला सुरुवात झाली. आणि त्यांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मध्येच मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यामुळे अजित पवारांच्या भाषणात व्यत्यय आला. ज्यामुळे ते यावेळी चांगलेच संतापले. तसेच त्यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना चांगलंच खडसावलं. 

नेमकं काय घडलं? 


खरंतर झालं असं की  अजित पवार बोलत असताना प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. त्यानंतर अजित पवारांनी त्या व्यक्तीस खाली बसायला सांगितले. तर काही वेळाने पुन्हा एकदा त्या व्यक्तीने अजित पवारांच्या भाषणात व्यत्यय आणला. त्यानंतर मात्र पवारांनी त्याला कडक शब्दात सुनावले. तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का असे म्हणत पवारांनी त्याला खडसावले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीकडून नोटीस येण्याआधी भाजप नेते आधीच नाव घेत होते’- संजय राऊत

News Desk

भीमा-कोरेगाव दंगलीबाबत नवा खुलासा

News Desk

माथाडी कामगार संघटनामध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna