HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू – देवेंद्र फडणवीस 

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. लोकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. राज्य सरकार कोरोना आटोक्यात आणला आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात याचे आश्चर्य वाटते. मात्र यानिमित्ताने जे पाठ थोपटून घेतात त्यांना सांगणे आहे की, सर्वाधिक कोरोना केसेस महाराष्ट्र आणि मुंबईतका, सर्वात जास्त मृत्यू इथे का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मुंबई पालिकेवरभाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू, अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. २०२२ साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला होता.

मुंबई भाजप कार्यकारणी बैठकीचा समारोप झाला. त्यावेळी ते बैठकीत मार्गदर्शन करीत होते. मला विश्वास आहे की, ही भाजपची मुंबईतील नवी कार्यकारणी ही मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, फडणवीस म्हणालेत. कोरोना मृत्यू लपवले गेले आहेत, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रची भीषण अवस्था का? काही लोकांनी आपलेच चांगभल करून घेतले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे. आम्ही आधी टीका करत नव्हतो, मात्र आता भ्रष्टाचारची लक्तरे टांगल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाविकासआघाडी सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड इमारत दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू तर ९ जण बचावले

News Desk

छत्रपतींचे नाव असलेल्या योजनेतही शासनाचा घोटाळा

News Desk

यंदा जगभरात साईपादुका दर्शन सोहळा!

News Desk