नाशिक | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपच्या नेत्यांना फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची पडझड रोखण्यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राजकरण आता कोणत्या दिशेला जाते हे पाहावे लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये वसंत गीते आणि सुनील बागुल या दोन बड्या नेत्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर उद्या (१३ जानेवारी) देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येणार आहेत. यावेळी ते भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस भाजपमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी नेमकं काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.