HW News Marathi
महाराष्ट्र

‘ताई, मी तुम्हाला दीर्घायुष्य चिंतितो’, फडणवीसांकडून पंकजा मुंडेंना शुभेच्छा !

मुंबई। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा काल(२६ जुलै) वाढदिवस होता. अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील अनेक नेत्यांनीही पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशावेळी भाजप कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं होतं ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटकडे. देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंकडा मुंडे ताई! मी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्ट चिंतितो! असं ट्वीट करत फडणवीसांना पंकजा मुंडेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

धन्यवाद देवेनजी

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट द्वारे पंकजा मुंडेंना शुभेच्छा दिल्या आणि पंकजा मुंडेंनेही त्या ट्विटला उत्तर दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्यानंतर तासाभराने पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. फडणवीस यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. थँक्यू देवेनजी, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत.

नव्या मंत्र्यांची यादी जाहीर होण्यापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, राज्यातून डॉ. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. त्यानंतर पंकजा मुंडे या प्रतिक्रिया देताना भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. पुढे राज्यात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झालं. शेवटी पंकजा मुंडे दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना राजीनामे परत घेण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी समर्थकांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपले नेते आहेत, असं भाष्य केलं. मात्र, आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नाही.

प्रीतम मुंडेंकडून खास शुभेच्छा

प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातलं प्रेम आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. प्रीतम मुंडे यांनी आपल्या बहिणीला विशेष शशुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रीतम ट्विटमध्ये म्हणतात- ‘५ वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’.

चला भेटूया…..

उर्मिला मातोंडकर यांनी पंकजा मुंडेंना ट्विटर वरून शुभेच्छा दिल्या आहेत. याच ट्विटला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं आहे. “भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!” असे ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी दुपारच्या सुमारास केले. त्यावर “धन्यवाद, फारच गोड. आपण भेटलं पाहिजे” अशी प्रतिक्रिया पंकजांनी दिली. त्याला “कधीही, माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे” असं उत्तर उर्मिला यांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमचे चेहरे पहिल्यानंतर कोरोना जगात नाही असे वाटते…

News Desk

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २७ फेब्रुवारी रोजी मतदान

Aprna

‘बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’ मनसेची विठ्ठलचरणी प्रार्थना!

News Desk