HW News Marathi
महाराष्ट्र

“अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू”, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला  

बीड | राज्याच्या राजकारणातील दोन बडे चेहरे आणि वैयक्तिक आयुष्यातील बहीण भाऊ म्हणजेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही नेत्यांना गहिनीनाथ गडाने एकाच मंचावर आणलं. हे चित्र पाहण्यासाठी बीडकरांची गर्दी लोटली होती. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही उपस्थितांना संबोधित केलं. पंकजा मुंडे मंचावर असताना धनंजय मुंडे यांनी भाषण केलं. या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो, असं धनंजय मुंडे म्हणाले. गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या मंचावरुन धनंजय मुंडेंनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व आपल्या खांद्यावर घेण्याचं भाष्य केलं.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

“संत वामनभाऊंवर, गडांच्या भक्तांवर, या सर्वांवर आपण असंच प्रेम आणि आशिर्वाद ठेवा. या गडाची, या मतदारसंघाची आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या खांद्यावर घेतो, असं धनंजय मुंडे म्हणाले. अनेक वर्ष आपला जिल्हा पिछाडीवर आहे. आपल्या जिल्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून संबोधलं जातं. मात्र येणाऱ्या या चार वर्षात जिल्ह्याच्या समोरचं मागासलेपण हटवून, ऊसतोड मजुरांचा नाही तर ऊस पिकवणाऱ्यांचा जिल्हा अशी ओळख देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे”, असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिलं.

“अनेक संकटं येतात जातात, मी कुठल्या संकटाला घाबरलो नाही. आताच्या संकटाचा उल्लेखसुद्धा एका महंतांनी केला. अशी किती जरी संकटं आली, तरी जनतेच्या मनात आपण स्थान निर्माण केलं असेल तर आशिर्वाद कधीच कमी पडत नाही. आजच्या या संकटातसुद्धा तुमचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत. देव तारी त्याला कोण मारी, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. जगातलं कुठलं मोठं पद, भविष्यात कोणतं महत्त्वाचं पद मिळेल की नाही माहित नाही, पण पुण्यतिथीच्या पूजेचं, या पवित्र पूजेची जबाबदारी जी तुम्ही दिली, आयुष्यात माझ्यासाठी सर्वात मोठं पद कोणतं असेल तर ती पुण्यतिथीची पूजा आहे, ती मला आज या गडातून मिळालं. यापेक्षा जास्त काही बोलणार नाही. माजी पालकमंत्री म्हणाल्या आता आमची जबाबदारी विकासाची आहे आणि त्यासाठी शुभेच्छा पण दिल्या. त्यांना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू”, असा टोलाही यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजांना लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आताच लोकार्पण झालेल्या डोंबिवलीच्या कोपर पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात!

News Desk

…तर इस्राईलच्या पंतप्रधानांसारखी वेळ मोदींवर येऊ शकते – सामना अग्रलेख

News Desk

‘आम्ही १६२’ ! महाविकासआघाडीचे सर्व आमदारांची पहिल्यांदा ‘परेड’

News Desk