HW News Marathi
महाराष्ट्र

‘पवार साहब की लाठी ऐसी बैठती है, बहुत दिनो के बाद पता चलता है की कैसी बैठी!’ -धनंजय मुंडे

अंबाजोगाई | भाजप नेत्यांनी मधल्या काळात फोडाफोडी केली, त्यांच्यातील काहींना सांगितलं की होतं, की पवार साहेबांचा नाद करू नका, काहींनी केला; आता भोगत आहेत! “पवार साहब की लाठी ऐसी बैठती है, बहुत दिनो के बाद पता चलता है की कैसी बैठी।” अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांविरुद्ध तुफान टोलेबाजी केली आहे. महाविकास आघाडीचे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे आयोजित पदवीधर मेळाव्यात बोलत होते.

अंबाजोगाई तालुक्यात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक पदवीधर नोंदणी झालेली असून, ही नोंदणी प्रक्रिया राबविणाऱ्या सर्व घटकांचे मुंडे यांनी अभिनंदन केले. येथे मतदानही सर्वाधिक होईल असा विश्वास यावेळी बोलताना मुंडे यांनी व्यक्त केला. शिक्षक – पदवीधर यांच्या विविध प्रश्नांसह गेल्या वर्षभरात कोरोना व अन्य प्रश्नांवर राज्य सरकारने केलेल्या कामगिरीवरही धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले.मदत केंद्र सरकारला आणि प्रश्न राज्य सरकारला विचारणाऱ्या राज्य भाजप नेतृत्वाचा पुरता गोंधळ उडाला असून, त्यांच्या अपप्रचारकडे लक्ष देण्याचीही आता गरज नसल्याचे मुंडे म्हणाले. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेचाही मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.

राज्याचे पैसे केंद्राकडे अडकून असताना, राज्याच्या तिजोरीवर ताण असताना देखील राज्य सरकार कठीण प्रसंगात चांगले काम करायचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, डोक्याला तेल लावलेले विरोधक मात्र आपले पाप झाकून नको त्या मुद्द्यांना हवा देऊन विरोध आणि टीका करण्याचं राजकारण करत आहेत, या राजकारणाला आपल्या मतातून उत्तर देऊन भाजपची पुन्हा पदवीधर निवडणूक लढायची हिम्मत होणार नाही असे विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बहुजन समाजाच्या नेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला या प्रकरणावरुन खुप त्रास झाला – अजित पवार

News Desk

“….तर अजित पवार आणि शरद पवारांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन”, चंद्रकांत पाटलांचा शब्द

News Desk

तरूणीची अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या

News Desk