मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून काँग्रेस नेत्याला संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून संजय दौंड हे यांनी आज या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केेला. भाजपकडून राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परळीच्या राजकारणात मागील 35 वर्षांपासून मुंडे आणि दौंड कुटुंबातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे.आज ज्या संजय दौंड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे त्या संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड यांनी 1985 मध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव केला होता. ते काही दिवस राज्यमंत्रीही होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा कधीही निवडून आले नाहीत.90, 99 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
धनंजय मुंडे यांनी संजय दौंड यांचा 2 वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करून विजय मिळवला तर एक वेळा संजय दौंड यांनी पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांचा पराभव केला. मात्र आज त्याच संजय दौंड यांना उमेदवारी मिळावी म्हणून धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले तर धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी दौंड पिता पुत्रानी मेहनत घेतली.
आज या निमित्ताने शत्रुत्व ते मैत्री असे सर्कल पूर्ण झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.