HW News Marathi
देश / विदेश

भैय्यू महाराजांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

इंदूर | अध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी मंगळवारी रहात्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर आज इंदोर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता इंदूरमधल्या मुक्तीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठीत नमूद करत भैय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसात राजकारणापासून प्रयत्न पूर्वक दुर असलेल्या भैय्यूजी महाराज यांच्या अचानक आत्महत्या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप कोणतेही कारण अस्पष्ट असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला निवडणूक

News Desk

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

swarit

राफेल कराराबाबत कॅगचा अहवाल आज लोकसभेत

News Desk