HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढला?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न

मुंबई | तौक्ते चक्रीवादळ सध्या गुजरातमध्ये धडकले आहे.कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा तडाखा दिल्यानंतर गुजरातकडे वादळाने मार्गक्रमण केले होते. या वादळामुळे कोकणासह गुजरातमधील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज गायब असून, शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यावरून आता प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात सध्या दुसऱ्या जिल्हयात जाताना ई पास आवश्यक आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दौरा करण्यासाठी ई-पास काढलाय का, प्रश्न एका आरटीआय कार्यकर्त्याने मुख्य सचिवांना विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात, चक्रीवादळाने झालेले नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्यावरच आता प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यांत कोरोना संबंधीच्या नियमांचे उल्लघन होत असल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा अचानक दौरा केला होता. या दौऱ्याच्या अनुषंगाने काळे यांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार अर्ज केला आहे का, याची माहिती मागविली आहे. राज्यभर दौरे करणाऱ्या फडणवीस यांच्या दौऱ्यावर प्रथमच अशी हरकत नोंदवण्यात आली आहे.

भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. त्यावेळी कोरोनासंबंधीच्या नियमांचा भंग झाल्याची तक्रार काळे यांनी केली आहे. त्याअनुषंगाने मुख्य सचिवांकडे माहितीच्या अधिकारात त्यांनी अर्ज केला आहे. कोपरगावमधील या कार्यक्रमास येण्यासाठी फडणवीस यांनी जिल्हा बदलासाठी आवश्यक असणारा ई-पास काढला होता का?

१० पेक्षा जास्त लोकांची गर्दी करण्यास मनाई आहे, असे असताना फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक एकत्र येण्यास परवानगी दिली होती का? यासंबंधी पोलीस, तालुका किंवा जिल्हा प्रशासनाने कारवाई केली असल्यास त्याचा तपशील मिळावा, अशी माहिती काळे यांनी मागविली असून त्यासोबत कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि छायाचित्रेही पाठविली आहेत.

भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, फडणवीसांनी केली मागणी

निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. रायगडमध्ये जे नुकसान झालंय, त्याचा आढावा आम्ही घेतला आहे. जवळपास ८ ते १० हजार घरांचे नुकसान झाले असून, विशेषत: ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी तांदूळ, इतर फळपिकांचे नुकसान झाले. जवळपास २०० शाळांचे नुकसान झाले आहे. २५ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती देत सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयासमोर सरकारी कर्मचा-याचा आत्मदहनचा प्रयत्न

News Desk

आता ईडीकडून नितीन सरदेसाईंची देखील चौकशी होणार

News Desk

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश

News Desk