HW News Marathi
महाराष्ट्र

‘दिलीप कुमारांचं निधन म्हणजे देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान’, पंतप्रधानांचा सायरा बानोंना फोन

मुंबई | हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार दिलीप कुमार यांचे आज (७ जुलै) सकाळी ७ वाजता हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. हिन्दीसिनेसृष्टीतील पहिला महानायक, ८ फिल्मफेर पुरस्कार व अनेक गाजलेले चित्रपट अशी त्यांची कारकीर्द होती. बरेच दिवस दीर्घकाळ आजाराशी झुंज आज अखेरीस संपली. त्यांच्या निधनाचा चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार शोक करत आहेत. राजकारण्यांनीही त्यांच्या ट्विटद्वारे दुःख व्यक्त केलं आहे.

देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान

वयाच्या ९८व्य वर्षी त्यांचं निधन झालं. पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. चाहत्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. नरेंद्र मोदी यांनी सायरा बानो यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांना धीर दिला. ‘देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान’, पंतप्रधान मोदींचा सायरा बानोंना फोन. त्यांनी ट्विटद्वारे आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

 

दिलीप कुमारांची कारकीर्द

दिलीप कुमारांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांना मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुकात झाली आहे. ८ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. फिल्मफेअर पुरस्कारात १९ वेळा नामांकने मिळवणारेही ते एकमेव अभिनेते होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट!

News Desk

सुशांतसिंग प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल !

News Desk

दारुड्यांचा हल्ल्यात जखमी झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मानले आभार

News Desk