HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोडांना ‘क्लिन चिट’ नाही! दिलीप वळसे पाटलांची माहिती

पुणे | गृहणमंत्री दिलीप वळसे यांनी आज (१६ जुलै) माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. या वेळी त्यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट देण्याचा संबंध येत नाही असंही स्पष्ट केलं आहे. ”आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही” असे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून संजय राठोड यांना ‘क्लिनचिट’ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आता त्यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली झाली आहे. मात्र याच दरम्यान संजय राठोड प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

पुन्हा मंत्रिपद देण्यात येईल?

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येसाठी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. या आरोपामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात”आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही” असे त्यांनी म्हटल्याची माहिती झोन पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणाचा आमचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राजीनाम्याचं नेमकं कारण काय?

संजय राठोड यांनी या प्रकरणामुळे न्हवे तर विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. मुंबईला येऊन २८ फेब्रुवारीला त्यांनी राजीनामा दिला होता.पूजा चव्हाणने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ दिसेनासे झाले होते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्यापासून ‘घट’ बसतील पण घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील? शालिनी ठाकरेंची टीका!

News Desk

हायपरलूपच्या स्वप्नाला ‘रेड सिग्नल’

swarit

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारातून शिवसेनेने दिली उमेदवारी

News Desk