HW News Marathi
महाराष्ट्र

माजी गृहमंत्र्यांच्या घरावरील छापेमारीवर आजी गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पुणे | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी सीबीआयने छापेमारी केल्यानंतर आता ईढीच्या रडावर ते आहेत. आज (२५ जून) ईडीने सकाळी अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापा टाकला. तसेच, ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“या संदर्भात मी काही बोलण्याची गरज आहे, असं वाटत नाही. यंत्रणेचा तपास सुरू आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे. त्यामुळे या संदर्भात मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. ”असं गृहमंत्री वळसे पाटील यावेळी प्रतिक्रिया देताना तसेच, मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र आहे, असंही त्यांनी सांगितलं.

लग्नात वाढणारी गर्दी चिंतेचा विषय

जास्तीत जास्त मेडिकल सुविधा द्यायचा विचार करत आहोत. लसीकरण वाढवलं पाहिजे. सुपर स्प्रेडर लोकांचा अटकाव करावा लागेल. केंद्र सरकार याबाबत मार्गदर्शन करत आहे. लग्नात वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. कारण तेथून प्रसार अधिक होऊ शकतो. पोलिसांना याबाबत सूचना दिल्या आहेत, मिटिंग घ्यायला सांगितले आहे, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. देशात आणि राज्यात नवा विषाणू आढळून आला आहे. डेल्टा प्लस अधिक घातक आहे. लसीकरण झालं तरी धोका होऊ शकतो, याकडे वळसे पाटलांनी लक्ष वेधलं.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा

गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कदमांनी केलेल्या आरोपानंतर परब अन् सामंतांनी दिल्या प्रतिक्रिया

Aprna

आधी ‘म्याव-म्याव’, अजब ‘कोंबडी’ अन् ‘डुकर’; राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरला?

Aprna

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा ठराव

Aprna