HW News Marathi
महाराष्ट्र

आधी ‘म्याव-म्याव’, अजब ‘कोंबडी’ अन् ‘डुकर’; राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरला?

मुंबई | राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात एमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहे. पण आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नितेश राणे या दोघांमध्ये सोशली मीडियावर ट्वीटरवॉर सुरू झाले आहेत. मलिकांनी आज (२५ डिसेंबर) त्यांच्या ट्विटर हँडलवर एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला फोटो ट्वीट केला. यानंतर नितेश राणेंनी देखील डुकराचा फोटो मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आहे. या दोन्ही नेत्यांनी फोटो मॉर्फ करून एमेकांवर टीका केली आहे. यावरून राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळ होत आहे.

https://twitter.com/nawabmalikncp/status/1474291871136452608?s=२०

मलिकांनी ट्वीटमध्ये म्हटले, “पैहचान कौन ?,” असे ट्वीट केले आहे. मलिकांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केला आहे. मलिकांच्या ट्वीटला राणेंनी देखील जशास तसे उत्तर दिले. राणेंनी ट्वीटमध्ये,” मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आहे. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..ओळखा पाहू कोण?,” असे फोटोला कॅप्शन राणेंनी दिली आहे. राजकीय नेत्यांच्या या ट्वीटरवॉरवरून राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

https://twitter.com/NiteshNRane/status/1474566026394161158?s=२०

विधिमंडळाच्या अधिवेशनात राणेंनी सरकारविरोधात आंदोलन सभागृहाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर आंदोलन करत देत होते. त्यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधिमंडळात दाखल होत होते. तेव्हा राणेंनी ‘म्याव-म्याव’ असा मांजराचा आवाज काढून आदित्य ठाकरेंना चिडविले. यानंतर राणे खूप खूश होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी विधिमंडळातच्या पायऱ्या चढताना राणेंकडे दुर्लक्ष करत सभागृहात दाखल झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांनी पुन्हा धरली घरची वाट!

News Desk

ईडीने आज मुंबईत येस बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले

News Desk

कितीही प्रयत्न केले तरी मुंबईपासून बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, सुप्रिया सुळेंचा आदित्यनाथांना इशारा

News Desk