HW News Marathi
महाराष्ट्र

राजकारणात परस्पर विरोधी असणारे मुंडे बहीण भाऊ लातूरमध्ये आले एकत्र!

लातूर | राजकारणात परस्पर विरोधी असणारे मुंडे बहीण भाऊ जेव्हा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले की चर्चेला उधाण उठते. नुकत्याच लातुरात पार पडलेल्या कौटुंबिक लग्न समारंभात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे एकाच स्टेजव असल्याचे फोटो सध्या सोसिअल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

गेल्या 11-12 वर्षांपूर्वी राजकारनामुळे विभक्त झालेले मुंडे बहीण भाऊ यांना एकत्र पाहण्याचा योग्य फारच क्वचित येतो ,राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे शनिवारी लातूर येथील एका कौटुंबिक विवाह सोहळ्यात एकत्र आलेले दिसून आले. “मतभेद असले तरी मनभेद नसावेत” ही म्हण या बहीण भावांनी अनेकवेळा खरी ठरवून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर या बहीण भावांनी गळाभेट घेतली होती. त्याहीवेळा याची खूप चर्चा झाली होती. जेंव्हा ना.धनंजय मुंडे यांना कोरोनाने गाठले होते तेंव्हा पंकजा यांनी त्यांची आत्मीयतेने चौकशी करून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या, तसेच जेंव्हा पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली तेंव्हा धनुभाऊ यांनी सुद्धा बहीण पंकजा याची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाच्या व्यासपीठावरून एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे दोघेही बहिणभाऊ जेंव्हा जेंव्हा कुठल्यातरी निमित्ताने एकत्र येतात तेंव्हा त्याची भरपूर चर्चाही होते. बहीण-भावाने एकत्र असलेच पाहिजे अशी त्यांना एकत्र पाहणाऱ्याची अपेक्षा असते. विचाराने विभक्त असले तरी कौटुंबिक भावनेने आणि नात्याने या दोघांना एकत्र पाहिले की चर्चेला मात्र निश्चित उधाण उठते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाभकास आघाडीच्या ३ चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली – चंद्रकांत पाटील

News Desk

बीडमध्ये २४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार; चौघांवर गुन्हा नोंद!

Aprna

राज्यसभेतील राजीव सातवांच्या रिक्त जागी पृथ्वीराज चव्हाणांना संधी द्या!

News Desk