HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

दिवाळीच्या सुट्टीत वाढ, १४ दिवस असणार सुट्टी – वर्षा गायकवाड

मुंबई | दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची विनंती अखेर मान्य झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीच्या सुट्टीत नऊ दिवसांची वाढ केली आहे. उद्यापासूनच (७ नोव्हेंबर ) ऑनलाईन शिक्षण बंद होणार आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 5 नोव्हेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी केवळ पाच दिवसांचीच दिवाळीची सुट्टी होती. मात्र आता ही सुट्टी नऊ दिवसांनी वाढल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गही खुश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. वर्षा गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याचे सांगताच आनंदाची लहर पसरली, मात्र अवघ्या पाच दिवसांची सुट्टी असल्याने अनेक जण हिरमुसले

Related posts

“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असतात?”, मुख्यमंत्र्यांचा सवाल

News Desk

एसटी महामंडळाचा ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

News Desk

गोड्या पाण्यातील मच्छिमारांचे धरणे आंदोलन

News Desk