HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

एखाद्या वाक्याने व्यक्ती वाईट होत नाही !

मुंबई | “मी इंदोरीकर महाराजांचे समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल ते विधान करायला नको होते. पण, दिवसरात्र किर्तने करून तो माणूस समाज प्रबोधनाचे काम करतात. मात्र, एका वाक्याने व्यक्ती वाईट होत नाही,” अशी मवाळ भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याबद्दल घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल (१७ फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होती.

‘स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते,’ असे वादग्रस्त विधान इंदोरीकर यांनी केले होते. इंदोरीकरांच्या वादग्रस्त विधानावर सर्व स्तरातून टीका होती आहे. तसेच  इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन, समर्थकांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. इंदोरीकरांनी पत्रत म्हटले की, “कोणीही, कुठेही, रॅली, मोर्चा, एकत्र जमने, आंदोलन करणे करू नये,” असे आवाहन समर्थकांना केले आहे.

महाराज इंदुरीकर महाराज नेमके काय म्हणाले?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

 

 

Related posts

मुंबई पोलीस आयुक्त पदी परमबीर सिंग यांची नियुक्ती

अपर्णा गोतपागर

निता अंबानी साईबाबांच्या चरणी

News Desk

आदित्य ठाकरेसोबत शिवसेनेचे ‘हे’ १० आमदार आज घेणार शपथ

News Desk