HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या काळात राजकरण नको!

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी बोलताना इतर देशांमध्ये कोरोनाची स्थिती काय आहे ते सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. कोणाचं देखील नाव न घेता ते म्हणाले की, “तुम्ही सांगत आहात की लॉकडाऊन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरू”. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि, “हो रस्त्यावर उतराच पण कोरोना कायमचा जावा म्हणून उतरा, डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवा यांच्या मदतीसाठी रस्त्यावर या”,असं मुख्यमंत्र्यानी आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-

* येत्या काही दिवसांत राजकीय नेते, पत्रकार, अन्य तज्ज्ञांशी बोलतो. लॉकडाऊनला काही पर्याय आहे का त्यावर चर्चा करतो

* राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येतील

* टीका करणाऱ्यांनो रस्त्यावरती उतराच ! कोरोनापरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरा

* लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही असे नाही. फक्त त्यांची घातकता कमी होईल.

* रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणीही उपाय सांगत नाही.

* लस घेतली तरी मास्क घालणे अनिवार्य

* लॉकडाऊन करायचा का ? इतर देशांनी काय केलंय

* जीवाशी खेळ नको, कृपया राजकारण नको

* अमेरिकेतही ७ कलमी कार्यक्रम सुरू, ब्राझील, रशिया, फ्रान्स, हंगेरीचीही स्थिती नाजूक

* दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करणार

* स्वयंशिस्तीने ही स्थिती आपण टाळू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास खा डार्क चॉकलेट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिला सल्ला

News Desk

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार !

News Desk

कोरोनाबाधितांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा !

News Desk