HW News Marathi
Covid-19

मलिकांनी ॲानलाईन बकरा खरेदी केला आहे का ? बकरी ईदवरून राजकारण तापलं !

राज्याचे मंत्री खोटं बोलत असून मुस्लीम समाजाला मूर्ख बनवत असल्याचा आरोप भाजप नेते आणि महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी केला आहे

मुंबई | कोरोनाच्या परिस्थितीचा परिणाम  राज्यातील अनेक सण आणि उत्सवांवर झाला आहे.गणोत्सव आणि बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.मात्र बकरी ईदआधी राजकारण तापायला सुरूवात झालीये. मंत्री अस्लम शेख आणि नवाब मलिक हे मुस्लिम समाजाला फसवत असल्याचा आरोप करत भाजप नेते खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली .

बकरी खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाइन बकरी खरेदी करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी कुर्बानीसाठी ऑनलाइन बकरा खरेदी करण्याचं मुस्लीम बांधवांना आवाहन केलं होतं. या मुद्द्यावरून आता भाजप नेते खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी जोरदार टीका केली आहे.राज्याचे मंत्री खोटं बोलत असून मुस्लीम समाजाला मूर्ख बनवत असल्याचा आरोप भाजप नेते आणि महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी केला आहे

नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी स्वत: तरी ऑनलाइन बकरे खरेदी केले आहेत का? कुर्बानीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची शहानिशा ऑनलाइन कशी केली जाणार? याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बकऱ्याच्या कुर्बानीविषयी कोणतीही माहिती न देता परस्पर निर्णय घेतला जात असल्याचा आरोपही हाजी अराफात यांनी केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळालंय?” भाजपच्या संजय काकडेंचा टोला

News Desk

राहुल गांधींच्या भेटीसाठी नाना पटोले दिल्लीला जाणार, ‘हे’ आहे कारण

News Desk

गेल्या २४ तासांत ५ हजार ६११ आजवरची सर्वांत मोठी वाढ, कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर

News Desk