HW News Marathi
महाराष्ट्र

‘वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून सूट देताय का?’ मनसेचा सवाल!

मुंबई। राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशावेळी दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांकडून आज ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे बाळा नांदगावकरांसह मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल केलाय. वरुण सरदेसाईवरुन गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? असा सवाल देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय.

घंटानाद आंदोलनाचा इशारा दिलाय

राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दहीहंडी ठिकठिकाणी साजरी केली. मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात. मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितलं नाही? वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? अशी प्रश्नांची सरबत्तीच संदीप देशपांडे यांनी केलीय. एकेकाळी रँड नावाचा अधिकारीह असा वागायचा. त्यावेळी चाफेकर बंधुंनी आवाज उठवला तशीच वेळ आता आली आहे. मुख्यमंत्री म्हणतात हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? तर हो… हे स्वातंत्र्ययुद्धच आहे, असंही देशपांडे म्हणालेत. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यावर आम्ही आदेश मिळेल तेव्हा आंदोलन करू असं संदीप देशपांडे म्हणाले.

स्टुलावर उभं राहून फोडायची का?

राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी म्हटले.

असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला

बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात दहीहंडी फोडली. पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे- बंगळूर महामार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला

News Desk

केंद्रातील तुमचं ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ सरकार आहे – महेश तपासे 

News Desk

नवाब मलिक यांच्या विरोधी भाजप नेते मोहित कंबोज यांची पोलीस ठाण्यात तक्रार

News Desk