HW News Marathi
महाराष्ट्र

‘बहाणेबाजी बंद करा, तुम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

सांगली | राज्याला महापुराचा मोठा झटका बसल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळींसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाहणी दौरा करत आहेत. ते आज सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. राज्य सरकारनं बहाणेबाजी बंद करावी. स्वत:ची जबाबदारी झटकून द्यायची, असं कसं चालेल? आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. महाविकास आघाडी सरकारनंही केंद्राकडे बोट करण्याऐवजी स्वत: मदत करावी, असं आव्हान फडणवीस यांनी केलं आहे.

जलसंपदा खात्याचा अंदाज चुकल्यामुळेच यंदा अधिक नुकसान झालं. सांगली आणि कोल्हापूरच्या पूरस्थितीबाबत वडनेरे समितीनं जो अहवाल तयार केला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. तसंच फडणवीस यांनी यावेळी जयंत पाटील यांची प्रकृती लवकर सुधारावी अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा

दुसरीकडे केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 27 टक्के तर इडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. ऑल इंडिया कोट्यातून ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नसल्यानं अनेक ओबीसी मुलं डॉक्टर होण्यापासून वंचित राहत होती. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं फडणवीस म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंध्रा प्रदेश सरकारने कुरुक्षेत्र महासभा उधळून लावले

News Desk

मराठा आंदोलक आक्रमक,नदी पात्रात उडी घेऊन एकाची आत्महत्या

News Desk

‘…आता ठिणगी पडली, आमच्या नादाला लागू नका’ संजय राऊतांचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा

News Desk