HW News Marathi
महाराष्ट्र

Dongri Building Collapsed : दोषींवर कठोर कारवाई करणार !

मुंबई | पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी (१६ जुलै) मुंबईतील डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. या पाहणीनंतर “या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल”, असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील धोकादायक इमारती आणि तेथील नागरिकांचे पुनर्वसन या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्री भेट घेणार असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

“मुंबईतील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. प्रशासनाने अशा इमारतीमधील नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची गरज आहे. या इमारत दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल”, असे सुभाष देसाई यावेळी म्हणाले. डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर तात्काळ दुर्घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली व जखमींना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२५ वर्षांनंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायली जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास!

News Desk

संजय राठोडांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर ‘चक्काजाम’ आंदोलन

News Desk

संत तुकोबांच्या पालखीचे दुपारी २ वाजता देहूहून प्रस्थान

News Desk