HW News Marathi
महाराष्ट्र

‘आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका, पण मतदान काँग्रेसलाच करा’

नांदेड। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत वाद निर्माण केला आहे. त्यांनी पैसा कोणाचाही घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे. ते देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत बोलत होते.यावेळी त्यांनी म्हटले आहे की, पंढरपूरमध्ये जी चूक मतदार राजाकडून घडली माझी इथल्या मतदारांना विनंती आहे ही चूक घडू देऊ नका. तुमचं मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक एक कार्यालय ३० हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपाचा पैसा घ्यायचा पण काँग्रेसला मतदान करा असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले आहे.

अमोल मिटकरी याचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी अमोल मिटकरी याठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात २००९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले.

मतदारांना अजब ऑफर

याआधी भाजपा चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना ऑफर दिली होती. ज्या गावात भाजपाला एकूण मतदानाच्या ७० टक्के मतं मिळतील, तिथे माझ्याकडून गावजेवण घातलं जाईल, असं पाटील म्हणाले होते. त्यासोबतच, ज्या प्रभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, तिथल्या अध्यक्षांना विशेष बक्षीस देखील दिलं जाईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. विशेषत: या सर्व गावांमध्ये गावजेवणाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार! – अजित पवार यांची घोषणा

Aprna

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या मुलाला ED कडून समन्स

Aprna

‘पुण्य नगरी’ वृत्तसमुहाचे प्रमुख मुरलीधर शिंगोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

News Desk