HW News Marathi
महाराष्ट्र

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या मुलाला ED कडून समन्स

मुंबई | दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. आता मलिकांचा मुलगा फराज मलिका ईडीने समन्स बजावला आहे. फराज मलिकांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याच्या माहिती मिळाली आहे. परंतु, फराज मलिकांनी कागदपत्रे जमावण्यासाठी आठवड्याचा वेळ मागितला होता. परंतु, ईडीने फराज मलिकांची विनंती फेटाळून लावली आहे. 

दरम्यान, मलिकांना विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. गेल्या २० वर्षांतील गुन्ह्यांच्या उत्पन्नाचा तपास करण्यासाठी पुरेसा वेळ लागेल, असे विशेष न्यायालायने म्हटले आहे. मलिकांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची जमीन ही बाजार भावाच्या तुलने कमी दरात खरेदी केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ईडीने बुधवारी (२३ फेब्रुवारी) ईडीने त्यांची ८ तास चौकशी करत त्यांना अटक केली होती. 

 मलिकांनी मला केलेली अटक ही चुकीची असल्याचा आरोप करत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेली आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणात ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असून या प्रकरणात ३०० कोटीची मालमत्ता व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिकांचा संबंध असल्याचे ईडीच्या तपासात अढळून आले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणुक जाहीर

News Desk

“५०० कोटी देण्याची ताकद आहे?”; धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर पंकजा संतापल्या

News Desk

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Aprna