HW News Marathi
क्राइम

“कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागील काही दिवसांपासून अनेकदा एनसीबी च्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केलीय. वानखेडेंनी फसवणूक करुन इंडियन रेव्हेन्यू सर्विसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. आपल्या दाव्याला पाठबळ देण्यासाठी मलिक हे मागील काही दिवसांपासून वानखेडेंसंदर्भातील कागदपत्रं सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत आहेत. मात्र आता यावरुनच भाजपाच्या एका नेत्याने नवाब मलिक यांच्यावर टीका करताना त्यांच्या या कागदोपत्री दाव्यांवरुन त्यांना, ‘नवाब मलिक झेरॉक्स सेंटर’ असं म्हटलं आहे.

जन्माचा कथित दाखला ट्विटरवरुन शेअर केला होता

क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून केल्या जात असलेल्या तपासाबाबत देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली आहेत. नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांच्या जन्माचा कथित दाखला ट्विटरवरुन शेअर केला होता. यामध्ये समीर यांचं नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचं दिसत होतं. यावरुन मलिक यांनी समीर वानखेडेंनी ते मुस्लीम असल्याचं लपवून खोटी कागदपत्रं सादर करुन नोकरी मिळवल्याचा आरोप केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

News Desk

गतीमंद मुलीवर उत्तर भारतीय तरुणाने केला बलात्कार

News Desk

सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला फटकारलं- “खास आरोपीला फायदा व्हावा म्हणून..”

News Desk