HW News Marathi
महाराष्ट्र

रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका पंकजा मुंडें यांची जलसंपदामंत्र्यांवर टीका!

परळी। यंदा पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे.

आणि यात आता बीडसह मराठवाड्यात पावसाचा हाहा:कार वाढला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पूरस्थितीची पाहणी केली. त्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. पूर परिस्थितीची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्याकडेला पाहणी करतायेत. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.

बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय

दरम्यान, जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यात जलसंपदा विभागाची बैठक घेतली. बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल, जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

एका हातात नातू, दुसऱ्या हातात नुकसानीची मोळी आणि डोळ्यात अश्रू…

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती वाया गेली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यानंतर हैराण झालेल्या अंबाजोगाई येथील वयस्क शेतकऱ्याने आपल्या लहानग्या नातवासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. एका हातात नातू, दुसऱ्या हातात नुकसानीची मोळी आणि डोळ्यात अश्रू… अशा परिस्थितीत या शेतकऱ्याने जयंत पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यावेळी जयंत पाटील यांनी या शेतकऱ्याला धीर दिला. घाबरू नका. सरकार तुमच्याबरोबर आहे, असं सांगत जयंत पाटील यांनी या शेतकऱ्याला धीर दिला. अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची बैठक सुरू आहे. त्यासाठी जयंत पाटील अंबाजोगाई येथे आले होते. ही बैठक सुरू असतानाच कार्यकर्त्यांमधून मार्ग काढत या वयस्क शेतकर्‍याने जयंत पाटलांची भेट घेतली. पावसाने नुकसान झालेली मोळी घेऊन डोळ्यात अश्रू दाटलेल्या या शेतकर्‍याने भेट घेतली. हातात नुकसानीची मोळी घेऊन आलेल्या त्या शेतकऱ्याचे म्हणणे जयंत पाटील यांनी ऐकून घेतले व त्यांना घाबरु नका सरकार तुमच्या सोबत आहे, असा धीराचा शब्द दिला.

यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

जालना, परभणी व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून जयंत पाटील यांनी आज सकाळी बीड येथे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आम्ही करत आहोत. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जायकवाडी धरणावर देखील आमचे लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस झाला याची माहिती घेऊन पुढे काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज घेतला जात आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. जलसंपदा विभाग कालपासून सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. नुकसान कमीत कमी व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. मांजरा धरणाची देखील दारे उघडण्याची स्थिती उद्भवली आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

News Desk

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुपूर्द

News Desk

अमेझॉन आणि फ्लिपकार्टने मराठी भाषेचा पर्याय आणा अन्यथा मनसे स्टाईलने सण साजरा होईल!

News Desk