मुंबई | “कोणत्याही कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका, आणि असे कोणी केले तर त्यांच्यावरकडक कारवाई केली जाईल,” असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तसेच कर्मचारी कामावर रूज व्हायला लागले आहे. काल (२५ नोव्हेंबर) रात्री उशीरापर्यंत जवळजवळ १२ ते १३ हजार कामगार कामावर परतले आहे. आज सायंकाळी पुन्हा एकदा तपासून किती मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर आलेत हे पाहावे लागेल, असे परबांनी आज (२६ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना म्हणाले.
बेरच कामगार आम्हाला सांगत आहे की, त्यांना कामावर याईचे आहे. जे कामगार येणार आहेत. त्यांना पूर्णपणे सरक्षण दिले जाईल, असे आश्वासन परबांनी माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, कामगारांना हाय कोर्टाने देखील आदेश दिले की, कोणत्याही कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका, आणि असे कोणी केले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.”, असा इशारा परबांनी दिला आहे. कामगारांच्या मनातील संभ्रम जो काही आहे. तो निघेल बरेसे कामगार परिस्थिती बघत असतात. येण्याची इच्छा असते. परंतु भीती असते मनात. हळूहळू ती भीती कमी होते. आणि ते कामगार कामावर येतात, असा अतापर्यंतचा अनुभव असल्याचेही परबांनी सांगितले.
विलीनीकरणाचा निर्णय कोर्ट देऊल ते राज्य सरकार मान्य करणार
“सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर गेले आणि आता गुणरत्न सदावर्ते या प्रश्नावर परब म्हणाले, “मी कोण नेतृत्व करतय त्यापेक्षा माझ्या कामगारांच्या मनात काय झाले, हे मला जास्त महत्वाचे आहे. कामगारांच्या मनात जो विलीनीकरणाचा मुद्दा मनात आहे. तर मी तुम्हाला सांगतो की, विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. कोर्टाने नेमलेली समिती जो अहवाल कोर्टात सादर करेल. यानंतर कोर्ट जो निर्णय देईल, तो निर्णय राज्य सरकार मान्य करेल, हे आम्ही याआधीही सांगतले होते आणि आताही सांगत आहे. आता १२ आठवडे आम्ही एसटी बंद ठेवू शकत नाही. म्हणून आम्ही संप मागे घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले,” असल्याचे ही परबांनी यावेळी नमुद केले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.