HW News Marathi
महाराष्ट्र

अर्जुन खोतकरांच्या घर आणि कार्यालयावर ED चा छापा, आठ तासांपासून चौकशी सुरू

मुंबई | शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील घरी आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी छापा टाकला आहे. जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी अर्जुन खोतकरांच्या ऑफिसवर ही छापेमारी करण्यात आली आहे.

जालन्यामध्ये शिवसेनेचे नेते अर्जून खोतकरांच्या घर आणि कार्यालयावर आज (२९ नोव्हेंबर) सकाळी साडेआठ वाजता ईडीचा छापा पडला. गेल्या आठ तासांपासून खोतकरांची चौकशी सुरू आहे. खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये आहे. १२ जणांचं पथक या ठिकाणी तपासणी करत आहे. यावेळी कोणालाही आत प्रवेश दिला जात नाहीय.

छापा पडला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच होते अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये अर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती. यापूर्वी खोतकरांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत. मालक नाही, असं खोतकर यांनी स्पष्ट केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरसंघचालक मोहन भागवतांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत ?

News Desk

सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी CBI करणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश

News Desk

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती

News Desk