HW News Marathi
Covid-19

Dr. Avinash Bhondwe HW Exclusive : डॉक्टरांवर हल्ले का होत आहेत ?

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या लढाईत जिवाची पर्वा न करत डॉक्टर, नर्से आणि वैद्यकीय कर्मचारी काम करत आहे. राज्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी अध्यादेशात वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरोधात हिंसेवर कडक शिक्षेची तरतूदसंदरभातएच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत सविस्तर चर्चा केली आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले जाणून घेण्यासाठी डॉ. अविनाश भोंडवे यांनी इतिहासातीली डॉक्टरांवर झालेल्या घटनवर एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना उजाळा दिला.

गेल्या काही दिवसात डॉक्टर, नर्से आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला होत याहे या प्रश्नावर बोलताना आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे बोलताना म्हणाले, डॉक्टरांवर होणारे हल्ल्याची त्यांनी पार्श्वभूमी सांगिती ९०च्या दशकात मुंबईतील सिंघानिया नावाचे रुग्णालय पूर्णपणे जाळण्यात आले होते. यानंतर डॉक्टर, नर्से, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णलयावर हल्ले होणे यांचे प्रमाण खूप वाढल्याचे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. २००८ आणि २००९ साली संपूर्ण महाराष्ट्र व्यापी अशी डॉक्टरांनी आंदोलने केली. यानंतर महाराष्ट्र सरकारने एप्रिल २०१० मध्ये कायदा अस्तित्वात आणला. हा कायदा आणूनही त्यांची आमबलजावणी हो होत नव्हती. महाराष्ट्रसह देशातील१९ राज्यात अशा प्रकराचे कायदे आहेत, मात्र या कायद्याची आमबलबजावणी फारशी निट होत नाही, अशी खंत आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे. महाराष्ट्रात २०१० पासून ते २०२०पर्यंत आतापर्यंत फक्त २ केसमध्ये आरोपीला शिक्षा झाली. यात मुंबईतील वसई आणि नाशिकमधील केसच्या आरोपींना शिक्षा झाल्याची माहिती भोंडवे यानी एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना सांगितले.

यामुळे देशभरातील आयएमएच्या डॉक्टरांनी चर्चा सुरू होती की, केंद्र कायद्याची गरज आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यावर वचक बसेल. या कायद्यामुळे गुन्हा करताना विचार करेल. यामुळे डॉक्टरांवर हल्ले कमी होतील. यामुळे डॉक्टरही आत्मविश्वासाने काम करतील, असे भोंडवे यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले. ऑगस्ट २०१९मध्ये कलकत्त्याला डॉक्टरांना मारहाण झाली. यात एका डॉक्टरचा मारहाणीत डोळा फोडला गेला. आणि त्या दिवशी डॉक्टरांच्या वसतीगृहावर मोठा हल्ला झाला. या संपूर्ण घटनेचे पडसाद देशभरात पडलेले आपण पाहिले आहेत. यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र असा एक कायदा असणे अवश्यक आहे. यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत ऑगस्ट २०१९मध्ये कायद्याचा मसुदा त्यांनी संपूर्ण भारत भर सादर केला आह. यात सामान्य लोकांनी डॉक्टरांनी आणि कायदे तज्ञांनी यावर काही सुधारणा सांगितलेया. डिसेंबर २०१९ला डॉक्टरांच्या सुरक्षतितेसंदर्भातील कायदा संसदेत सादर होणार होता. मात्र, ४ डिसेंबरला संसदेत कोणतेही कारण दाखवता हा कायदाय गृह खात्यांनी तो मागे घतेला. यासंदर्भात देशभरात यावर चर्चा देखील झाली. या कायद्यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे लक्ष्यात आले.

डॉक्टरांचे प्रतिकात्म आंदोलन

दरम्यान, देशात जानेवारीमध्ये कोरोनाची साथ आली आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सर्व डॉक्टर लढा देत आहोत. ऐवढी कठीण परिस्थिती असताना सुद्धा डॉक्टरांवरील हल्ले कम झाले नाही. मुरादाबादमधील दगडफेक, मेरठ आणि दिल्लीमध्ये डॉक्टर विद्यार्थ्यींनीसोबतचा गैरवर्तन आणि मालेगावमध्ये आमदारांनी डॉक्टरांना केलेली मारहाण असो. मात्र, कडी झाली ती म्हणजे चेन्नईमध्ये डॉक्टर लक्षमी नारायण रेड्डी, डॉक्टर सायलो आणि डॉक्टर सायमन हे नामवंत डॉक्टर कोरोनावर उपाचर करत होते. त्यांचा मृत्यू झाला या तिन्ही घटना वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी घटल्या आहेत. यावेळी घटना ज्या घडल्या त्या सारख्या होत्या. यावेळी तिन्ही डॉक्टरांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिनीवर सर्वासामान्य नारिकांनी हल्ला केला त्यांच्या काच्चा फोडोल्या आणि या डॉक्टरांच्या नातेवाईकांना मारहाण केली. या डॉक्टरांच्या मृतदेहाची अवहेलना केली. डॉक्डरांनी आतापर्यंत खूप संयम बाळगला होता. मृत्यूनंतर डॉक्टरांच्या मृतदेहाला सन्मान मिळत नसेल तर हे लक्षात घेऊन २२ एप्रिल डॉक्टरांनी ठरवले की, संपूर्ण देशव्यापी प्रतिकात्म आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. मात्र, कोरोनाविरुद्धच्या लढाई काम थांबवचे नाही. डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णलायत आणि दवाखान्यात एक मेणबत्ती लावयाची आणि ती विझेपर्यंत तिथेच थांबयचे असा एक ‘वाईट अलर्ट’ असे प्रतिकात्म आंदोनल केले होते. आम्ही वाईट आहोत, रक्तने आम्हाला लाल करू नका, असा संदेश यातून दिला, असे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अध्यादेशात काढला

यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देशभरातील काही निवड डॉक्टर यात डॉ. अविनाश भोंडवे माझा देखील समावेश होता, त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी आध्यादेश काढू या असे त्यांनी मान्य केले. जगभरात कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय डॉक्टरांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. यामुळे डॉक्टरांनी जर प्रतिकात्म आंदोलन केले. तर याला गालबोट लागले असे गृहमंत्री म्हणाले. यानंतर डॉक्टरांच्या सुरक्षा लक्ष्यात घेऊन आध्यादेश काढून राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांची स्वाक्षरी झाली. यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रकाश जावेडकर यांनी तो आध्यदेश सर्वांपुढे मांडला. डॉक्टरांनी सूचविलेल्या सर्वा गोष्टी नमुद केला आहे. मात्र, संसदेश आधिवेशनात या अध्यादेशाचे कायद्या रुपांतर होईल, असे आश्वासन डॉक्टरांना दिल्याचे डॉअविनाश भोंडवे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे.

डॉक्टर अविनाश भोंडवे यांची संपूर्ण मुलाखत

 

https://www.youtube.com/watch?v=AXQZT06D374

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?”, राज ठाकरेंचा मोदींना सवाल

News Desk

चव्हाणांचे डोके ठिकाणावर आहे का?,अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसलेंची जहरी टीका

News Desk

मुख्यमंत्र्यानी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

News Desk