HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने लागू केला ड्रेस कोड, सरकारी कार्यालयात कोणते कपडे घालावे याबाबतचे निर्देश जाहीर

मुंबई | आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून ड्रेसकोडबाबत नवे नियम ठरवले आहेत. मंत्रालयात आता जिन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही. शिवाय गडद रंगाचे चित्रविचित्र कपडे घालण्यास राज्य सरकारकडून मनाई घालण्यात आली आहे.

तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे.

काय आहेत नियम?

१- मंत्रालयात आता जीन्स टी शर्ट आता घालता येणार नाही.

२- महिलांनी साडी,सलवार चुडीदार,ट्राउझर पॅन्ट, त्यावर कुर्ता आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. तर पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर असा पेहराव करावा.

३- गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करू नये.

४- सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी स्लीपर्स वापरू नये.

५- महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट, सॅन्डल याचा वापर करावा.

६- आठवड्यातील एक दिवस ( शुक्रवारी) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे परिधान करावे.

७ – परिधान केलेला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असेल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही – जयश्री पाटील

News Desk

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय जारी

Manasi Devkar

त्या भगिनीला काय सांगू! इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे – जयंत पाटील

News Desk